हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
हिमाचल प्रदेशातील नैऋत्य मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकत असल्याने आणि इतर अनुकूल हवामान परिस्थितीमुळे, येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
उना, बिलासपूर, हमीरपूर आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याकरता यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. (5 जुलै) कांगडा आणि मंडी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. चंबा, सिरमौर, शिमला आणि कुल्लूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (6 जुलै) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि या दिवशी कांगडा, सिरमौर आणि मंडीमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उना, बिलासपूर, हमीरपूर, चंबा, सोलन, शिमला आणि कुल्लू जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
केदारनाथ यात्रामार्गावर भूस्खलन हजारो भाविक अडकले! उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर
सध्या, हवामान विभागाने 9 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. ढगफुटीमुळे मंडी जिल्ह्यामध्ये अतिशय नुकसान झाले आहे. हवामान खात्याने इतर जिल्ह्यांमध्ये पावसामुळे होणारे नुकसान दर्शविले आहे.
संपूर्ण जुलै महिना हिमाचल प्रदेशसाठी कठीण आहे. हवामान खात्यानुसार, संपूर्ण महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याची पूर्ण शक्यता आहे. हवामान खात्याने पुन्हा 5 जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा इशारा जारी केला आहे. हवामान केंद्राने कांगडा, मंडी, हमीरपूर, शिमला आणि सिरमौर येथे अचानक पुराचा इशारा जारी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List