गाझापट्टीत इस्रायलचा रात्रभर हवाई हल्ला
इस्रायल युद्धविरामासाठी तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच हमासनेही हा प्रस्ताव स्वीकारावा अन्यथा त्याचे भयंकर परिणाम होतील असा इशाराही दिला होता. त्यानंतरही इस्रायलने गाझापट्टीत हवाई हल्ला केला तसेच अंधाधुंद गोळीबार केला. रात्रभर करण्यात आलेल्या या हल्ल्यात 94 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. यात मदत केंद्र तसेच रुग्णालयातून परतणाऱ्या नागरिकांचाही बळी गेल्याचा दावा गाझापट्टीतील आरोग्यमंत्रालयाने केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List