मरण पत्करेन पण समर्पण करणार नाही, अयातुल्‍ला खामेनेई यांचे ट्रम्प यांना प्रत्त्युत्तर

मरण पत्करेन पण समर्पण करणार नाही, अयातुल्‍ला खामेनेई यांचे ट्रम्प यांना प्रत्त्युत्तर

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी खामेनेई यांना कोणत्याही अटीशिवाय सरेंडर करण्यास सांगितले होते. ट्रम्प यांना उत्तर देताना खामेनेई यांनी स्पष्ट सांगितले की, ते कधीही समर्पण करणार नाहीत आणि जर अमेरिकेचे सैन्य या संघर्षात हस्तक्षेप करेल, तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही खामेनेई यांनी दिला.

न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, खामेनेई यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की ” ज्यांना इराणचा इतिहास माहितीये ते कधीही धमकीच्या सुरात बोलणार नाहीत, कारण इराणी जनता कधीही समर्पण करत नाही.” त्यांनी हेही सांगितले की, जर अमेरिकन लष्कराने काही हस्तक्षेप केला, तर याची मोठी किंमत चुकवावी लागेल असेही खामेनेई म्हणाले.

खामेनेई यांचे हे विधान ट्रम्पच्या त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यामध्ये ट्रम्प यांनी खामेनेई यांची हत्या होऊ शकते, पण आत्ताच तसे करणार नाही, असे म्हटले होते. इस्रायलच्या “ऑपरेशन रायझिंग लायन”मध्ये सुरुवातीला अमेरिका अलिप्त होती. पण आता अमेरिकेने उघडपणे इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे.

दुसरीकडे इराण आणि इस्रायलच्या संघर्षात आतापर्यंत सुमारे 600 इराणी नागरिक आणि 24 इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे संपूर्ण भागात तणाव वाढला आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता निर्माण झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;