तब्येत बरी नसतानाही दीपक पाठक पुन्हा कामाला गेले, पण घरी परतलेच नाही

तब्येत बरी नसतानाही दीपक पाठक पुन्हा कामाला गेले, पण घरी परतलेच नाही

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात 290 लोक मारले गेले आहेत. त्यात केबिन क्रू म्हणून काम करणारे बदलापूरचे रहिवासी दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक यांची तब्येत बरी नव्हती. तरी ते कामावर हजर झाले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. दीपक पाठक हे 36 वर्षांचे होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. तर सहा महिन्यांपूर्वी त्यांची बढती होऊन ते केबिन क्रू मध्ये त्यांचा समावेश झाला होता. दीपक कामावर असताना 10 ते 15 दिवस घरी येत नसत. यावेळी दीपक घरी 10-15 दिवसांनंतर आले होते. पण त्यांची तब्येत बिघडली होती, म्हणून त्यांनी रजा टाकली होती. पण कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांन कामावर बोलावण्यात आलं होतं. आजारपण बाजूला ठेवून दीपक कामावर निघून गेले होते. दीपक कुठेही असले की ते आईला फोन करायचे आणि काळजी घ्यायला सांगायचे. 11 जूनलाही दीपक यांनी आपल्या आईला फोन केला आणि लंडनसाठी निघालोय अशी माहिती दिली.

थोड्या वेळानंतर सर्व वृत्तवाहिन्यांवर विमानाच्या अपघाताची बातमी आली. पण आपला दीपक वाचला असेल अशी त्यांना आशा होती. त्यांनी दीपकला फोन केला पण दीपक फोन उचलत नव्हते. थोड्या वेळाने दीपक यांचा फोन स्विच ऑफ झाला आणि टीव्हीवर दीपक यांचा मृत्यू झाल्याची बातमी झळकली. या बातमीमुळे दीपक यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. दीपक यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे डीएनए टेस्टसाठी दीपक यांच्या बहीण अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;