Air India Plane Crash – विमान अपघाताचा थरकाप उडवणारा तो व्हिडिओ कसा झाला शूट? आर्यनने सांगितलं

Air India Plane Crash – विमान अपघाताचा थरकाप उडवणारा तो व्हिडिओ कसा झाला शूट? आर्यनने सांगितलं

अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त झाले. या अपघातात 265 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या अपघात नेमका कसा घडला याचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ आर्यन नामक एका मुलाने काढला होता. आर्यनने पहिल्यांदाच विमान पाहिले होते. तो विमान उड्डाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होता आणि मोबाईलमध्ये अपघाताची घटना कैद झाली.

आर्यन हा खेडेगावात राहतो. त्यामुळे त्याने कधीही विमान पाहिले नव्हते. सध्या तो अहमदाबाद येथे आला होता. यावेळी तो इमारतीच्या टेरेसवर गेला असता त्याला विमान उडताना दिसले. त्याने तात्काळ आपल्या मोबाईल काढला आणि विमानाचा टेकऑफ करतानाचा व्हिडिओ काढू लागला. परंतु 30 सेकंदातच विमान अपघातग्रस्त झाले आणि मी घाबरलो, असे आर्यनने मीडियाशी संवाद साधताना सांगितले.

आर्यनने काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. या अपघाताचा सहापेक्षा अधिक यंत्रणांकडून तपास सुरू आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स, डीव्हीडीआर डेटाची तपासणी फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;