Israel Iran War : इस्रायल-इराणचा भडका; Air India आणि Indigo कडून अ‍ॅडव्हायझरी जारी

Israel Iran War : इस्रायल-इराणचा भडका; Air India आणि Indigo कडून अ‍ॅडव्हायझरी जारी

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जगभरातील देशांवर होताना दिसत आहे. शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. मात्र काही काळासाठी हवाई क्षेत्र पुन्हा उघडण्यात आले. बंद हवाई क्षेत्रामुळे हवाई प्रवासावर मोठा परिणाम झाला होता. म्हणूनच इंडिगो आणि एअर इंडियाने एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या विमानांची स्थिती तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष लक्षात घेता इंडिगो अ‍ॅडव्हायझरी जारी करत म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीमुळे इराण आणि आसपासच्या हवाई क्षेत्राचा वापर करणे शक्य नाही. यामुळे अनेक विमानांचे मार्ग बदलले जात आहेत, ज्यामुळे उड्डाणांना विलंब होऊ शकतो किंवा प्रवासाचा वेळ वाढू शकतो.

यात पुढे सांगितले आहे की, इराणमधील आणि आसपासचे हवाई क्षेत्र अजूनही बंद आहे. काही उड्डाणे वळवण्यात येत आहेत, ज्यामुळे उड्डाणाचा वेळ वाढू शकतो किंवा उड्डाणाला विलंब होऊ शकतो. प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी आमच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर त्यांच्या उड्डाणाची स्थिती तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

एअर इंडिया अ‍ॅडव्हायझरीत काय म्हटलं आहे?

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन एअर इंडिया एअरलाइन्सने म्हटले आहे की, इराण आणि मध्य पूर्वेतील काही भागांचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. मार्ग बंद झाल्यामुळे विमान दुसऱ्या मार्गाने नेले जात आहे. यामुळे जास्त वेळ लागू शकतो. एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, हा अनपेक्षित व्यत्यय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्यामध्ये प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था देखील समाविष्ट आहे. यासोबतच उड्डाण रद्द झाल्यास रिफंड आणि मोफत री-शेड्युलिंगची सुविधा दिली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;