बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी मागे, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम

बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी मागे, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम

शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सातव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. सरकारने आपल्या मागण्या विचारात घेतल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे म्हटले. तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर 2 ऑक्टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत होता. शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळीही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत कर्जमाफी देण्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि दादा भूसे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत सरकारने मागण्यांची दखल घेतल्याचे म्हटले. यावेळी बच्चू कडू यांनी आपले आंदोलन तुर्तास माग घेत सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला. अन्यथा उदय सामंत यांच्या घराबाहेर आंदोलन करू असाही इशारा दिला.

पुण्यात अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ; शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;