Air India Plane Crash – विमान अपघातात मृत्यू झालेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत देणार, टाटा समूहाचा निर्णय

Air India Plane Crash – विमान अपघातात मृत्यू झालेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत देणार, टाटा समूहाचा निर्णय

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 274 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. टाटा समूहाने विमान अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत जाहीर केली होती. मात्र, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही समान मदत मिळावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA कडून करण्यात आली होती. ही मागणी टाटा समूहाने मान्य केली आहे.

शोकांतिका…; तीन लेकरांसोबत पत्नीसह लंडनला निघाले… विमानात काढला शेवटचा सेल्फी…

IMA ने मृत्यू झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी करताच टाटा समूहाने त्याची तातडीने दखल घेतली. यानंतर एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. “विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा समूह 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल. तसेच जे या अपघातात जखमी झालेले आहेत त्या सर्वांचा खर्च टाटा समूह करेल. कधीच भरून न निघणाऱ्या या हानीबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत. या दुर्घटनेतील पीडितांबद्दल संवेदना व्यक्त करतो”, असे भावुक होत विल्सन म्हणाले. इकॉनॉमिक्स टाइमने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Air India Plane Crash – चमत्कार! अपघातात भगवद्गीता सुरक्षित

IMA ने टाटा समूहाचे मानले आभार

टाटा समूहाने दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परतेबद्दल IMA ने टाटा ग्रुपचे आभार मानले आहेत. टाटा समूहाने जबाबदारीचे भान ठेवत वेगवान प्रक्रिया सुरू केल्याने IMA ने कौतुक केले आहे. तर आपण स्वतः घटनास्थळाला भेट दिली असून सरकारी अधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या आहेत. तसेच एअर इंडिया तपासात पूर्ण सहकार्य करेल आणि पीडित कुटुंबियांशी दीर्घकाळ संपर्कात राहील, असे एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;