अजित पवारांना विनंती, कोकाटेंना घरी बसवा, काय बोलायचं त्यांना अजिबात कळत नाही – रोहित पवार

अजित पवारांना विनंती, कोकाटेंना घरी बसवा, काय बोलायचं त्यांना अजिबात कळत नाही – रोहित पवार

“अजित पवार यांना मी विनंती करतो की, माणिकराव कोकाटे नावाचे जे मंत्री आहेत, त्यांना कृपा करून घरी बसावा. काय बोलायचं, कुठं बोलायचं त्यांना अजिबात काळात नाही. दररोज नवीन कोट कसे घालायचे हे त्यांना माहित आहे. पण शेतकऱ्यांचा फटका सदरा त्यांना दिसत नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे. ती अजितदादांनी मला दिली, असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. यावरच पुण्यात आयोजित पत्रकार परिषद रोहित पवार यांनी टीका केली आहे.

याशिवाय X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरुय. कृषि खातं ही ओसाड गावची पाटीलकी आहे’’ असं या खात्याचे खुद्द मंत्री माणिकराव कोकाटे हेच म्हणत असतील तर इच्छा नसताना त्यांनी ही फुकटची पाटीलकी करु नये.”

ते म्हणाले की, सरकारनेही त्यांना मंत्रीपदावरून दूर करून माणुसकी आणि संवेदनेचे धडे आधी द्यावेत. कृषि मंत्रीपदाच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी सेवा करण्याची संधी कार्यक्षम आणि संवेदनशील व्यक्तीकडं सोपवावी. यामुळं किमान शेतकऱ्याला न्याय तरी मिळेल. मुख्यमंत्री आणि अजित पावर यांनी यावर निर्णय घ्यावा.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;