हिंदुस्थान-पाकिस्तानमधील अणुयुद्ध मीच टाळलं; डोनाल्ड ट्रम्प यांनी डफडं पुन्हा वाजवलं, ‘मन की बात’ही सांगितली

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील अणुयुद्ध मीच टाळलं; डोनाल्ड ट्रम्प यांनी डफडं पुन्हा वाजवलं, ‘मन की बात’ही सांगितली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. हे युद्ध आपणच थांबवले अशी टिमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वाजवत आहेत. मीच हिंदुस्थान-पाकिस्तानमधील अणुयुद्ध थांबवल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला आहे.

शुक्रवारी ओवल ऑफिसमध्ये एलॉन मस्क यांच्यासोबत मीडियाला संबोधित करत असताना त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय आपलेच असल्याचे म्हटले. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष टळला. दोन्ही देशांमधील संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात झाले असते, मात्र आम्ही हा संघर्ष रोखला, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या टेरिफला अमेरिकेतील कोर्टाची स्थगिती

शांततेसाठी पुढाकार घेणाऱ्या दोन्ही देशांच्या नेत्यांचे आणि प्रशासनाचेही ट्रम्प यांनी आभार मानले. तसेच एकमेकांवर गोळ्या झाडणाऱ्यांसोबत आम्ही व्यापार करू शकत नाही, असेही ट्रम्प यांनी ठणकावले.

दरम्यान, हिंदुस्थान-पाकिस्तानमधील शस्त्रसंधींचा निर्णय द्विपक्षीय होता असे हिंदुस्थानने याआधीच स्पष्ट केले आहे. त्यानंतरही ट्रम्प सातत्याने याचे श्रेय घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 21 दिवासात 11 वेळा ट्रम्प यांनी आपणच हे युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे.


पंतप्रधान मौन का? काँग्रेसचा सवाल

दरम्यान, गेल्या 21 दिवसात 11 वेळा ट्रम्प यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचे म्हटले आहे. व्यापाराचं गाजर दाखवत हे युद्ध थांबवल्याचे मोदींचे मित्र ट्रम्प म्हणत आहेत. यावर पंतप्रधान मोदी मौन का आहेत? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;