Air India Plane Crash – माझी मुलगी रुग्णालयात, थोडी माणुसकी बाळगा… पीडित डॉक्टर पित्याची प्रशासनाकडे आर्जव

Air India Plane Crash – माझी मुलगी रुग्णालयात, थोडी माणुसकी बाळगा… पीडित डॉक्टर पित्याची प्रशासनाकडे आर्जव

अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान वसतिगृहावर कोसळल्याने विमानातील प्रवाशांसह वसतिगृहातील काही जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे जखमींची मृत्यूशी झुंज सुरू आहे तर दुसरीकडे प्रशासनाने वसतिगृह सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रशासनाच्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आदेशाबाबत डॉक्टर पित्याने नाराजी व्यक्त केली आहे.

डॉ. अनिल आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. अपघातावेळी ते दोघेही ड्युटीवर होते. तर त्यांची लहान मुलगी आणि मोलकरीण घरी होत्या. त्यामुळे विमान अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे मुलगी आणि मोलकरीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने त्यांना वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाचा आदेश ऐकल्यानंतर डॉ. अनिल यांनी माध्यमांसमोर आपली वेदना व्यक्त केली आहे.

माझी मुलगी अजूनही रुग्णालयात, थोडी माणुसकी बाळगा

डॉ. अनिल यांची मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे तर दुसरीकडे ते डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशातच अपघात घडलेल्या जागेची स्वच्छता करण्यासाठी आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी वसतिगृहाची संपूर्ण इमारत रिकामी केली जात आहे. यासाठी वसतिगृ रिकामे करण्याचे आदेश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. याबाबत डॉ. अनिल यांनी मीडियासमोर आपली वेदना कथन करत सरकारला आवाहन केले आहे.

माझी मुलगी अजूनही रुग्णालयात दाखल आहे. हात जोडून विनंती करतो की, दोन-तीन दिवसांचा वेळ द्यावा. माझ्यासोबत येथे कोणीही नाही. अशा परिस्थितीत, वसतिगृह रिकामे करणे अशक्य आहे. कृपया तुम्ही सर्वांनी माझा संदेश वरच्या लोकांना पाठवा. थोडी माणुसकी बाळगा, अशी विनंती डॉ. अनिल यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;