Mumbai News – अमेरिकेतून हिंदुस्थानात सोन्याची तस्करी, एअर इंडियाच्या क्रू मेंबरला डीआरआयकडून अटक

Mumbai News – अमेरिकेतून हिंदुस्थानात सोन्याची तस्करी, एअर इंडियाच्या क्रू मेंबरला डीआरआयकडून अटक

अमेरिकेतून हिंदुस्थानात सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एअर इंडियाच्या क्रू मेंबरला डीआरआयने मुंबई विमानतळावर अटक केली आहे. याप्रकरणी क्रू मेंबरसह सिंडिकेटच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 1373 ग्रॅम तस्करी केलेले सोने हस्तगत करण्यात आले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत 1.41 कोटी रुपये आहे.

13 जून 2025 रोजी न्यूयॉर्कहून मुंबईत आलेल्या AI-116 या विमानातील एका पुरुष क्रू मेंबरचा सोने तस्करीत सहभाग असल्याची माहिती डीआयआरला मिळाली. त्या माहितीच्या आधारे डीआरआयने क्रू मेंबरची झडती घेतली असता सुरवातीला कोणतीही वस्तू सापडली नाही. मात्र सतत चौकशी केल्यानंतर विमानातील बॅगेज सर्व्हिसेस एरियाजवळ काळ्या डक्ट टेपमध्ये गुंडाळलेले सोन्याचे बार असलेले पाऊच लपवून ठेवल्याचे कळले.

अधिकाऱ्यांनी हे पाऊस जप्त करत तपासणी केली असता आत 1373 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार आढळून आले. याआधीही हिंदुस्थानात सोन्याची तस्करी केल्याची कबुली क्रू मेंबरने दिली. यानंतर सिंडिकेटच्या मास्टरमाइंडलाही अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सत्तारांनी भूखंडावरील शाळा, मैदानाचे आरक्षण उठवले; भाजपच्या राज्यात सत्ताधारी आमदाराचा विकास सत्तारांनी भूखंडावरील शाळा, मैदानाचे आरक्षण उठवले; भाजपच्या राज्यात सत्ताधारी आमदाराचा विकास
तत्कालीन पालकमंत्री तथा सत्ताधारी मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील बसस्टँडच्या मागे असलेल्या 20 हजार चौरस फूट भूखंडावरील...
किम जोंग उनची पुन्हा सटकली; शस्त्रास्त्र उत्पादन वेगाने वाढवण्याचे दिले आदेश
Chandrapur News – सिंदेवाहीत जाटलापूर गावात पुन्हा रानटी हत्तींचा प्रवेश; एकाला चिरडले
मृत्युचं तांडव! गावकऱ्यांना घराबाहेर काढून अंदाधुंद गोळीबार; घरात लपलेल्यांना जिवंत जाळलं, 100 ठार, शेकडो जखमी
कामाची बात! तत्काळ पासपोर्ट तीन दिवसांत हातात
2030 पर्यंत हीट अँड रेनचा तडाखा दुप्पट बसणार; मुंबई, ठाणे, दिल्ली, चेन्नई, सुरत, हैदराबाद शहरांचा समावेश
राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच ‘एडीसी’पदी महिला, हरयाणाच्या सोलंकी यांची ‘यशस्वी’ वाटचाल