रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे टोकन दर्शन, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सोय

रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे टोकन दर्शन,  मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सोय

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन प्रणालीची 15 जून रोजी प्रथम चाचणी घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रथम चाचणी दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत. भाविकांनी टोकन दर्शनाचे बुकींग  मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करावे अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
तिरुपती बालाजी येथे भाविकांना दर्शनासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच टोकन दर्शन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे. दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावित वेळेत दर्शनहॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. ही प्रणाली विशेषत: गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;