MAYDAY..MAYDAY.. NO POWER…, अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचा शेवटचा संदेश; काय म्हणाले?
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताला दोन दिवस उलटल्यानंतर एक धक्कादायक ऑडियो संदेश समोर आला आहे. या अपघातात किमान 275 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये विमानातील 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. फक्त एक प्रवासी या अपघातातून वाचला असून, त्याच्यावर सध्या अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातापूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी अहमदाबादच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) तातडीचा संदेश पाठवला होता. ऑडियो संदेशात ते म्हणतात, “मे-डे… मे-डे… मे-डे… नो पावर… नो थ्रस्ट… गोइंग डाउन…” यानंतर विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला आणि काही क्षणांतच ते कोसळले.
कसा घडला अपघात?
विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याची उंची कमी झाली आणि ते मेघनीनगर परिसरातील एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या धडकेनंतर मोठी आग लागली आणि घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठले. विमानातील 241 जणांपैकी 12 क्रू मेंबर्स, ज्यामध्ये दोन पायलटांचा समावेश आहे, आणि जमिनीवरील वैद्यकीय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा 275 वर पोहोचला आहे, असं सांगण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List