Air India Plane Crash – सीट नंबर 11A, 27 वर्षानंतर पुन्हा चमत्कार, अपघातातून वाचलेल्या दोन प्रवाशांची सेम स्टोरी!

Air India Plane Crash – सीट नंबर 11A, 27 वर्षानंतर पुन्हा चमत्कार, अपघातातून वाचलेल्या दोन प्रवाशांची सेम स्टोरी!

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेत वाचलेला एकमेव व्यक्ती रमेश विश्वकुमार सध्या चर्चेत आहे. विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 लोक होते. मात्र त्यापैकी केवळ एक व्यक्ती चमत्कारीकरित्या बचावला. रमेश हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रमेश हे विमानातील 11A या सीटवर बसले होते. याच सीटबाबत आणखी एक आश्यर्यकारक घटना समोर आली आहे.

रमेश यांच्यासोबत झालेल्या चमत्काराने 27 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. थाई गायक आणि अभिनेता जेम्स रुआंगसाक लोयचुसाक हे देखील 27 वर्षांपूर्वी विमान अपघातात वाचलेले एकमेव व्यक्ती होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर जेम्स यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 27 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.

जेम्स रुआंगसाक लोयचुसाक हे डिसेंबर 1998 मध्ये थाई एअरवेजच्या फ्लाइट टीजी 261 मधून प्रवास करत होते. जेम्स हे देखील विमानातील 11A सीटवर बसले होते. विमान दक्षिण थायलंडमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच अपघात झाला. या अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला. जेम्स हे एकमेव व्यक्ती होते जे या अपघातात वाचले होते. मात्र या अपघातानंतर मला मानसिक धक्का बसला आणि त्यानंतर जवळपास 10 वर्षे मी विमान प्रवास केला नाही, असे जेम्स यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच पुढे त्यांनी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. अपघाताची बातमी ऐकून अंगावर काटा आला. या अपघातात ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली झेडपीत आता 61 गट होणार; खानापूर झेडपीचा नवीन गट, पंचायत समितीचे 122 गण सांगली झेडपीत आता 61 गट होणार; खानापूर झेडपीचा नवीन गट, पंचायत समितीचे 122 गण
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभागरचना...
कर्जबाजारी एक्स-रे टेक्निशियनने हडपसरमध्ये मारला तिजोरीवर डल्ला; 48 तोळे सोने, डायमंड घेऊन फरार आरोपीला बेड्या
पंढरपुरात प्रारूप मतदान – कॉरिडॉरला 485 पैकी 458 नागरिकांचा विरोध
अहिल्यानगरमधील रस्त्यांची अवस्था बिकट, महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर
कर्जतमधील ‘सीना’ ओव्हरफ्लो; जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच ओव्हरफ्लो होण्याची पहिलीच वेळ; 220 क्युसेकने विसर्ग
हॉटेल वेस्टेजमधून पालिकेने बनवला सीएनजी; दररोज 1300 किलो सीएनजीची निर्मिती
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आजपासून टोकन दर्शन, 1200 भाविकांना मिळणार दर्शन; मंदिराच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंगची सोय