151 एसएलआर, 65 इन्सास रायफल्स; मणिपुरात मोठा शस्त्रसाठा जप्त; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

151 एसएलआर, 65 इन्सास रायफल्स; मणिपुरात मोठा शस्त्रसाठा जप्त; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

मणिपुरमध्ये सुरक्षा दलांनी 13 आणि 14 जूनच्या मध्यरात्री पाच जिल्ह्यांमध्ये संयुक्त कारवाई करत 328 शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये 151 सेल्फ-लोडिंग रायफल्स (एसएलआर), 65 इन्सास रायफल्स, 73 विविध प्रकारच्या रायफल्स, 5 कार्बाइन आणि 2 एमपी-5 बंदुका यांचा समावेश आहे. तसेच स्फोटके आणि इतर युद्धसामग्रीही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईला सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.

मणिपुर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), हिंदुस्थानी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई इंफाल पश्चिम, इंफाल पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग या जिल्ह्यांच्या बाह्य भागात राबवली. गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) लहरी दोरजी ल्हाटू यांनी केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “ही कारवाई शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मणिपुर पोलीस आणि सुरक्षा दल सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत.”

गेल्या काही महिन्यांपासून मणिपुरमध्ये कुकी -झो आणि मेईतेई समुदायांमधील वांशिक तणावामुळे हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शस्त्रास्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी सुरक्षा दल सातत्याने कारवाया करत आहेत. जप्त केलेली शस्त्रे आणि स्फोटके मणिपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;