WTC Final 2025 – ‘This Time For Africa…’ कांगारुंचा फडशा पाडला, टेम्बा बवुमाची दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटचा ‘डॉन’ ठरला!

WTC Final 2025 – ‘This Time For Africa…’ कांगारुंचा फडशा पाडला, टेम्बा बवुमाची दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटचा ‘डॉन’ ठरला!

जागतिक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर जगज्जेतेपदाच्या लढतीत टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपणच कसोटी क्रिकेटचा खरा डॉन असल्याच सिद्ध केलं आहे. तब्बल 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने ICC ट्रॉफी उंचावली असून पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 282 धावांचे आव्हान दिले होते. सलामीला आलेल्या एडन मार्करमने संयमी आणि धीरोदत्त खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा चांगलाच समाचार घेतला. परंतु रायन रिकल्टन (6) आणि वियान मुल्डर (27) झटपट बाद झाल्यामुळे 70 धावांवर 2 अशी आफ्रिकेची अवस्था झाली होती. परंतु त्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा (134 चेंडू 66 धावा) आणि मार्करम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 143 धावांची भागी रचत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या जवळ नेलं. सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकेला जिंकण्यासाठी 69 धावांची गरज होती. मार्करमने आपली संयमी खेळी चौथ्या दिवशीही कायम ठेवली. 207 चेंडूंचा सामना करत त्याने 136 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला हेझलवूडने बाद केले परंतु मार्करम आफ्रिकेचा विजय निश्चित करून मैदानाबाहेर गेला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News