Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान

Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान

 

लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. या अपघात 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या वेळी विमानात आग लागली आणि तापमान एक हजार अंश सेल्सियसवर पोहोचले. त्यात प्रवाशांसह विमानी वितळून गेलं.

अधिकाकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि तापमान एक हजार अंश सेल्सियसवर पोहोचले होते. त्यामुळे बचावकार्य करण्यात अडथळे येत आहे. या आगीमुळे निर्माण झालेल्या तापमानात जगणं अशक्य आहे. विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन पेटल्यावर कुणाच्याही जिवंत राहण्याची शक्यता कमीच होती.

SDRF चे जवान घटनास्थळी पोहोचले पण तापमान इतके होते की बचावकार्य करताना अडचण येत होती. सगळीकडे ढिगारे आणि जळालेले अवशेष होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 265 मृतदेह रुग्णालयात आणले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;