मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?

मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?

गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना झालेले एअर इंडियाचे विमान कोसळले. गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 290 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला काही तास उलटत नाही तोच शुक्रवारी सकाळी मुंबईहून लंडनला मार्गस्थ झालेले एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरले. त्यामुळे विमानातील प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांचीही धाकधूक वाढली होती. अखेर यावर आता ‘एअर इंडिया’कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी एअर इंडियाच्या AI129 या विमानाने मुंबईतून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतले होते. जवळपास 3 तास हे विमान हवेमध्ये होते, मात्र त्यानंतर हे विमान पुन्हा माघारी फिरले आणि मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर हे विमानही अचानक माघारी आल्याने चर्चांना उधाण आले. अफवांचा बाजार उठण्याआधीच एअर इंडियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. इस्रायलने इराण केलेल्या हल्ल्यामुळे हे विमान पुन्हा माघारी फिरल्याची माहिती एअर इंडियाने एक्सवर पोस्ट करत दिली.

Air India plane crash – 5 महिन्यांपूर्वी लग्न, नवरा लंडनमध्ये डॉक्टर; नव्या संसाराची स्वप्न घेऊन ‘ती’ विमानात बसली, पण…

इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने हवाई क्षेत्र बंद केले आहे. इराणमध्ये आणीबाणीही लागू करण्यात आली आहे. दोन्ही देशातील तणावाचे वातावरण पाहता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाची काही विमाने वळवण्यात आली आहेत, तर काही माघारी बोलावण्यात आली आहेत. याची यादीही एअर इंडियाने जारी केली आहे. यात मुंबई-लंडन AI129 या विमानाचही समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;