मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी करण्यात आली असून, न्यायालयाने याप्रकरणी याचिकाकर्त्यांना 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस निवडून आले असून त्यांच्या या निवडीला काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज गुरुवारी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. फडणवीस यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर, तर याचिकाकर्ते गुडधे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महमूद प्राचा यांनी युक्तिवाद केला. निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 81(1) मधील  निकष पूर्ण करत नाही. त्यामुळे याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी फडणवीस यांच्या वतीने करण्यात आली; तर याचिका कायद्यानुसार दाखल करण्यात आली असून याचिकांवर घेतलेले आक्षेप निराधार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्याचे स्पष्ट केले; मात्र याचिकाकर्ते गुडधे यांनी लिखित युक्तिवाद सादर करण्याची परवानगी न्यायमूर्तींकडे मागितल्यावर त्यांना 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;