पंजाबमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लॅण्डिंग, कारण अस्पष्ट

पंजाबमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लॅण्डिंग, कारण अस्पष्ट

पंजाबच्या पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर उतरताच एकच खळबळ उडाली होती. दिलासादायक बाब अशी की यात कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा नुकसान झालेले नाही.

या इमरजेन्सी लॅण्डिंगबाबत कुठलाही बडा अधिकारी बोलण्यास नकार नाही. पठाणकोटमधून हे हेलिकॉप्टर उडालं आणि हेल्ड गावात इमरजेन्सी लॅण्डिग करावी लागली. 12 जून रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. आता लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग झाल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.

यावेळी नंगलपूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि लोकांना दूर केलं. या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लॅण्डिंग का करावे लागले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.एका शेतात हे हेलिकॉप्टक लॅण्ड करण्यात आलं. हे हेलिकॉप्टर बघण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली. या हेलिकॉप्टरचे लॅण्डिंग का करावे लागले याचे कारण कळाले नाही, कुठलाही अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहिये.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;