Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला; ढिगाऱ्यातून एक ब्लॅक बॉक्स सापडला; कशी घडली दुर्घटना? लवकरच समोर येणार

Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला; ढिगाऱ्यातून एक ब्लॅक बॉक्स सापडला; कशी घडली दुर्घटना? लवकरच समोर येणार

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली कशी? असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डीव्हीआर म्हणजे डिडिटल व्हिडिओ रेकॉर्डर सापडला आहे.

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला

अहमदाबाद एटीएसच्या अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीम सोबत घटनास्थळी तपास केला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले आहेत. जवळपास तीन तास या पथकाने घटनास्थळी तपासणी केली आणि नमुने गोळा केले. आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळावरून रवाना झाली आहे. तसेच घटनास्थळावरून एटीएसने विमानाचा डीव्हीआर म्हणजेच डिडिटल व्हिडिओ रेकॉर्डर आपल्या ताब्यात घेतला आहे. यामुळे विमानाचा खरंच अपघात झाला की हा घातपात होता? किंवा या दुर्घटनेमागे परदेशी शक्तींचा हात होता का? यासह इतरही गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

अंगावर सीटबेल्ट आणि जळाल्याच्या जखमा, सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची रांग

अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या बोइंग 787 ड्रीमलायनर विमानाचा एक ब्लॅक बॉक्स आढळून आला आहे. तर दुसरा ब्लॅक बॉक्स तपासण्याचे काम सुरू आहे. विमानाने उड्डाण घेताच ते पुढील काही सेकंदात कोसळले कसे? हे ब्लॅक बॉक्सची तपासणी केल्यानंतर समोर येणार आहे.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांमधून विमानाचे डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे दोन्ही सापडले आहेत. यामुळे एअर इंडियाचे हे विमान कुठल्या कारणाने कोसळले? हे लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;