Air India Plane Crash – 1206 ठरला मृत्यूचा दिवस, तोच होता विजय रुपाणींचा लकी नंबर!

Air India Plane Crash – 1206 ठरला मृत्यूचा दिवस, तोच होता विजय रुपाणींचा लकी नंबर!

12 जून रोजी अहमदाबादमध्ये इतका मोठा अपघात घडला की, हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती हळहळला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान A171 कोसळले. या अपघातामध्ये 240 हून अधिक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. या घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही आपला जीव गमवावा लागला. रुपाणी हे पत्नी अंजली रुपाणी यांना घेण्यासाठी लंडनला जात होते. रुपाणी यांचा सीट नंबर 2 डी होता. असे म्हटले जात आहे की, रुपाणी यांनी 1206 हा त्यांचा भाग्यवान क्रमांक होता. आता याला नियतीचा खेळ म्हणा किंवा आणखी काही, या क्रमांकाची तारीख देखील त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरली.

Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

माजी मुख्यमंत्री रुपाणी यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे माहित आहे की, त्यांच्यासाठी 1206 हा फक्त एक आकडा नव्हता तर तो नशिबाचे प्रतीक होता. त्यांच्या पहिल्या स्कूटीचा नंबर असो किंवा त्याच्या मालकीच्या गाड्या असोत, सर्वांच्या नंबर प्लेटवर 1206 लिहिलेले होते. आतापर्यंत रुपाणींसाठी भाग्यवान असलेला 1206 हा क्रमांक त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. रुपाणी हे राजकोट शहरातील रहिवासी होते आणि त्यांच्या निधनाच्या बातमीने शहरात शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;