इराण – इस्रायलच्या संघर्षामुळे जम्मू कश्मीर हाय अलर्टवर, हिंदुस्थानने अनेक विमानं माघारी बोलवली

इराण – इस्रायलच्या संघर्षामुळे जम्मू कश्मीर हाय अलर्टवर, हिंदुस्थानने अनेक विमानं माघारी बोलवली

इस्रायल आणि इराण दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती होती. त्यात इस्रायलने शुक्रवारीच इराणवर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांचे एअरस्पेसही बंद केली आहे.

इराण आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे जम्मू कश्मीरच्या काही भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कश्मीरच्या शिया भागात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी शिया बहुल भागात या प्रकरणाच्या विरोधात आंदोलन होऊ शकतात. यावेळी शिया समुदायात तणाव असून हिंसा होऊ शकते असा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आपला एअरस्पेस बंद केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थान सरकारने अनेक विमानं माघारी बोलावली आहेत.

असे असले तरी यामुळे हिंदुस्थानला फार फटका बसलेला नाही. इराण आणि इस्रायलच्या संघर्षामुळे फार कमी विमानं परत बोलावली आहेत. तसेच दिल्ली विमानतळावर घोषणा केली जात आहे की आपल्या फ्लाईट्सबद्दल कुठलीही माहिती हवी असल्यात एअरलाईन्सशी संपर्क साधावा. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून आलेल्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;