Air India Plane Crash – धक्कादायक आणि दुर्दैवी ! उद्धव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

Air India Plane Crash – धक्कादायक आणि दुर्दैवी ! उद्धव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. संपूर्ण देश शोकमग्न असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 290 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना आणि शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘एअर इंडियाचा हा अपघात व त्यातील मृतांचा आकडा हेसुद्धा एक राष्ट्रीय संकट आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आई जगदंबा मृतात्म्यांना शांती देवो व मृतांच्या कुटुंबांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो, एवढेच मी या क्षणी बोलू शकतो. अपघाताचे दृश्य आणि मनुष्यहानी पाहून शब्द फुटत नाहीत, अशी माझ्यासह सगळय़ांची स्थिती आहे.’’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;