ब्लॅक फ्रायडे! शेअर मार्केट धडाम; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या 7 लाख कोटींचा धूर

ब्लॅक फ्रायडे! शेअर मार्केट धडाम; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या 7 लाख कोटींचा धूर

इस्रायल आणि इराणध्ये युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला केला आणि याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. जगभरासह हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसला आणि आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.

शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अकांनी कोसळला. सेन्सेक्समध्ये 1.6 टक्क्यांच्या घसरणीसह 80,354 वर पोहोचला, तर निफ्टी 1.7 टक्के घसरणीसह 24,473 वर पोहोचला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 1.5 टक्के घसरला. यामुळे बीएससीमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 449.6 लाख कोटींवरून 442.5 कोटींवर आले.

शुक्रवारच्या घसरणीमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकादारांच्या 7 लाख कोटींचा धूर झाला. तसेच दिवसभर बाजारावर ‘ब्लॅक फ्रायडे’ इम्पॅक्ट राहण्याची शक्यता आहे. गुरूवारीही एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर बाजारातही नकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि पडझड सुरू झाली.

घसरणीमागची प्रमुख कारणे

– इस्रायलने इराणच्या सैन्य ठिकाणांवर आणि अणुप्रकल्पांवर हल्ला केला आहे. गरज आहे तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले. त्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले.
– इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने अनेक देशांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
– आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असल्याने गुंतवणूकदार बॉण्डस, डॉलर आणि सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.
– डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत रुपया 54 पैशांनी घसरून 86.14 वर पोहोचला आहे.
– इस्रायल-इराण युद्ध हे घसरणीचे कारण असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेली टॅरिफ धोरणे आणि त्याचे भविष्यातील परिणाम याचाही बाजारावर परिणाम होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;