भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला

भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी वगळता सर्वांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सूरतच्या डॉ. हितेश शहा आणि त्यांच्या पत्नी अमिता शहा यांचाही मृत्यू झाला आहे. शहा दाम्पत्य लंडनना आपल्या भाचीच्या वाढदिवसासाठी जात होते.

सूरतच्या एका ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये हितेश शहा प्रॅक्टिस करत होते. लंडनमध्ये शहा यांची बहीण राहते. त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. आपल्या भाचीच्या वाढदिवासासाठी शहा लंडनला निघाले होते. यासाठी त्यांनी मोठी सुटीही काढली होती. पण वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 12 तारखेला झालेल्या अपघातात शहा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

डॉ. हितेश शहा यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले होते की 20 तारखेला ते लंडनला जाणार आहेत. पण त्यांनी तारीख बदलून ती 12 तारखेलाच लंडनसाठी निघाले. हितेश शहा हे जनरल सर्जन होते आणि आपले खासगी हॉस्पिटल बंद करून ते या ट्रस्टमध्ये प्रॅक्टिस करत होते. शहा आपल्या पत्नीसोबत लंडनला निघाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;