Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी

Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी

गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी (12 जून) दुपारी 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा समावेश होता. इंस्टाग्रामवर 56 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेले सोनघरे ही एक नामांकित ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होती. तिने एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूनही काम केले होते पण तिलाही विमान अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

रोशनी सोनघरे ही डोंबिवली येथील रहिवासी होती. रोशनी ही एअर इंडियाची फ्लाइट अटेंडंट होती. रोशनीने तिचे ट्रॅव्हल व्लॉग, तिची युनिक स्टाईल आणि सकारात्मक उर्जेने लोकांची मने जिंकली होती. रोशनीच्या मृत्यूनंतर, तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टवरही शेकडो कमेंट्स आल्या आहेत. तिथे तिला युजर्सनी श्रद्धांजली वाहिली आहे. रोशनीच्या चाहत्यांच्या घडलेल्या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाहीए.

 

View this post on Instagram

 

A post shared by Roshni Songhare 🌹 (@sky_loves_her)

गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानाचा काही भाग डीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवरही पडला, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले. विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते. दरम्यान अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी एक व्यक्ती जिवंत असल्याची माहिती दिली आहे. विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;