मुंबईत रेल्वे अपघात होतायत आणि ‘रीलमंत्री’ फक्त बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत; आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईत रेल्वे अपघात होतायत आणि ‘रीलमंत्री’ फक्त बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत; आदित्य ठाकरे यांची टीका

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेवर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच आहे. या दरम्यानच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मुंबईत रेल्वे अपघातात गेल्या 11 वर्षात 29970 प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. त्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विणी वैष्णव यांना फटकारले आहे.

”मुंबईत रेल्वे अपघात होत असताना रील मंत्री बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत. या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीही उपयोग नाही. बुलेट ट्रेनसाठी BKC मधली मोक्याची जागा फुकटात घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातलं आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र देखील हिसकावून घेण्यात आले. या सर्व खर्चांपेक्षा मुंबई लोकल ट्रेनच्या सुधारणांवर पैसा खर्च करायला हवा, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

रेल्वे अपघातांतील मृत्यू

मध्य रेल्वे मार्ग – 29,321 मृत्यू (2009 ते जून 2024)
पश्चिम रेल्वे मार्ग – 22,481 मृत्यू, 26,572 जखमी (2005 ते जुलै 2024)

मागील 20 वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 51 हजारांहून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी गेला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;