लॉर्ड्सवर फलंदाजांची ‘विकेट’, कसोटीचे जगज्जेतेपद थरारक वळणावर; ऑस्ट्रेलियाकडे 218 धावांची आघाडी
लॉर्ड्सवर आज वेगवान गोलंदाजांनी आपला कहर दाखवला. आधी कमिन्सने अवघ्या 28 धावांत 6 विकेट टिपत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 138 धावांत संपवत 74 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर आफ्रिकन गोलंदाज लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची विकेट काढत दुसऱया दिवसाचा शेवट 8 बाद 144 असा थरारक केला. लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी 14 विकेट पडल्या होत्या, तर दुसऱया दिवशीही गोलंदाजांनी 14 फलंदाजांच्या विकेट काढत कसोटी रंगतदार अवस्थेकडे झुकवली. पहिल्या दोन दिवसांतच 28 विकेट पडल्यामुळे कसोटीच्या डॉनचा फैसला शुक्रवारीच लागणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. दुसऱया दिवशी 229 धावांत 14 फलंदाज बाद झाले. ऑस्ट्रेलियाने दुसऱया 8 बाद 144 अशी मजल मारल्यामुळे त्यांची आघाडी 218 धावांपर्यंत पोहोचली आहे. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मिचेल स्टार्क 16, तर नॅथन लायन एका धावेवर खेळत होते.
कमिन्सपुढे आफ्रिकन फलंदाजी ढेपाळली
काल दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची 4 बाद 43 अशी नाजुक अवस्था करत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर आपले वर्चस्व राखले होते. कालच्या नाबाद टेम्बा बवुमा आणि डेव्हिड बेडिंगहमने धावसंख्येत 51 धावांची भर घालत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कर्णधार पॅट कमिन्सने आफ्रिकन कर्णधार बवुमाची विकेट काढत ही जोडी पह्डली. त्यानंतर बेडिंगहमने कायल वेरेनसह 32 धावांची भर घातली. वेरेनला पायचीत करत कमिन्सनेच ही भागी संपवली. त्यानंतर कमिन्सच्या माऱयापुढे तळाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. माकाx यान्सनलाही शून्यावर कमिन्सनेच बाद केले. पुढे बेडिंगहमचा खेळ 45 धावांवर संपवला. त्यानंतर आफ्रिकेचा डाव 138 धावांवरच संपुष्टात आला. शेवटचे 5 फलंदाज अवघ्या 12 धावांत गारद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवता आली. कमिन्सने आपल्या 18.1 षटकांच्या गोलंदाजीत केवळ 28 धावा देत 6 विकेट काढल्या.
ऑस्ट्रेलियाचे वीर कोसळले
पहिल्या डावात 74 धावांची आघाडी घेतल्यामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत होता; पण त्यांचा दुसरा डाव सुरू झाला आणि कगिसो रबाडाने पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीच्या रणगाडय़ापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला हादरवले. उस्मान ख्वाजा (6) आणि पॅमरून ग्रीन यांना अवघ्या 3 चेंडूंत बाद करत ऑस्ट्रेलियाला जबर धक्का दिला. मग या धक्क्यातून ऑस्ट्रेलियन फलंदाजीला कुणीच सावरू शकला नाही. लाबुशेन (22) आणि स्टीव्हन स्मिथने (13) संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच लुंगीने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीची पुंगी वाजवली. त्याने स्मिथपाठोपाठ ब्यू वेबस्टर (9) आणि पॅट कमिन्सची (6) विकेट काढून ऑस्ट्रेलियाची 7 बाद 73 अशी केविलवाणी अवस्था केली. मात्र त्यानंतर अॅलेक्स पॅरी आणि मिचेल स्टार्कने संघाची पडझड रोखत आठव्या विकेटसाठी 61 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाच्या जिवात जीव आणला. दुसऱया दिवसाचा खेळ संपायला अवघी 15 मिनिटे शिल्लक असताना रबाडाने पॅरीची विकेट घेत सामन्याचा थरार आणखी वाढवला. पॅरीने 50 चेंडूंत सामन्याला थरारक करणारी 43 धावांची खेळी साकारली. त्यानंतर स्टार्क आणि लायनने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. लुंगीच्या या माऱयापुढे कसोटी दुसऱयाच दिवशी थरारक अवस्थेकडे झुकली असून कसोटीच्या जगज्जेतेपदाचा फैसला तिसऱयाच दिवशी लागणार हे निश्चित आहे. मात्र ऑस्ट्रेलिया जेतेपद राखतो की दक्षिण आफ्रिका आपले पहिले जगज्जेतेपद काबीज करतो हे उद्याच कळू शकेल.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (प. डाव) सर्व बाद 212, द.आफ्रिका (प. डाव) ः सर्व बाद 138 (टेम्बा बवुमा 36, डेव्हिड बेडिंगहम 45; मिचेल स्टार्क 2/41, पॅट कमिन्स 6/28) ऑस्ट्रेलिया (दु. डाव)ः 8 बाद 144 (मार्नस लाबुशेन 22, अॅलेक्स पॅरी 43, स्टार्क खेळत आहे 16; रबाडा 3/44, लुंगी एनगिडी 3/35).
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List