अंगावर सीटबेल्ट आणि जळाल्याच्या जखमा, सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची रांग

अंगावर सीटबेल्ट आणि जळाल्याच्या जखमा, सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची रांग

भीषण विमान दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना अहमदाबादच्या सिव्हील हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरला हलवण्यात आले. बहुतांश मृतावस्थेत होते, तर काही बेशुद्ध होते. त्यांच्या अंगावरील सीटबेल्ट तसेच होते, तसेच शरीरभर जळाल्याच्या जखमा होत्या. त्यांची ओळख पटवणे अवघड जात होते.

अपघातात बचावलेले आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितांनादेखील गंभीर भाजल्याच्या जखमा दिसून आल्या. मात्र हे बचावलेले लोक विमानातील आहेत की विमान कोसळले त्या ठिकाणचे आहेत याबद्दल काही समजले नसल्याचे इन्स्टिटय़ूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटरचे संचालक  डॉ. प्रांजल मोदी यांनी सांगितले.

‘‘बहुतांश रुग्णांचे चेहरे जळाले आहेत. ते बेशुद्ध आहेत. पीडितांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. अनेक रुग्णांनी अजूनही सीटबेल्ट लावलेले होते, ओळख पटवण्यासाठी त्यांचे खिसे कसे तपासणार,’’ असे डॉ. मोदी म्हणाले. गुजरातच्या आणंद आणि इतरही अनेक जिह्यांतून प्रवाशांना सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. दुर्घटनेनंतर  नातेवाईक आणि कुटुंबीय  रुग्णालयामध्ये त्यांच्या प्रियजनांबद्दल काही माहिती मिळेल का याची वाट पाहत होते.

सहा इंटर्न डॉक्टरांचे मृतदेह सापडले

हा अपघात एवढा भीषण होता की एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती बी. जे. मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टरांचे वसतिगृह होते. एमबीबीएस, एमडीचे विद्यार्थी येथे राहत होते. विमान धडकले तेव्हा वसतिगृहात 50 ते 60 डॉक्टर्स होते. अपघातानंतर वसतिगृह इमारतीचा मोठा भाग कोसळला. आग आणि धुराचे प्रचंड लोट यामुळे इमारत जळून खाक झाली. यात 5 ते 6 डॉक्टरांचे मृतदेह सापडले आहेत. वसतिगृहात आणखी डॉक्टर्स असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

जेवताना घात झाला

इंटर्न डॉक्टर वसतिगृहातील मेसमध्ये जेवण करत होते. त्याचवेळी हा भयंकर घात झाला. मेसमधील दृष्य मन हेलवणारे होते. सर्वत्र अन्न, प्लेट, ग्लास विखुरले होते. काही डॉक्टर्स गंभीर जखमी अवस्थेत होते.

अपघातानंतर अहमदाबादसह वडोदरा, सुरतहून 25 अग्निशमन दलाच्या गाडय़ा दाखल झाल्या. मदत आणि बचाव पथकेही आजूबाजूच्या शहरांतून आली.

एअर इंडिया विमान अपघात, प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी मदत कक्ष 

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱया एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन पेंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि सहाय्यासाठी 022-22027990, 022-22794229 भ्रमणध्वनी 9321587143, आपत्कालीन मदत क्रमांक 1070 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा देण्याची मागणी मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा देण्याची मागणी
मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा केली....
दादरच्या सावरकर सदनाचे बांधकाम जैसे थे, राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाबाबत प्रतिज्ञापत्रसादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ
कृत्रिम तलावांतील विसर्जनाच्या सक्तीमुळे चेंगराचेंगरीचा धोका! विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करण्याची परवानगी द्या
शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची व्यवस्था वेगवेगळी नसल्यास हॉटेल, उपाहारगृहांवर कारवाई होणार; एफडीए आयुक्त राजेश नार्वेकर यांचे सक्त निर्देश
विक्रोळी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला, पूर्व उपनगरातील कोंडी फुटणार
कोकण रेल्वे स्थानकांवर परप्रांतीय पोटभाडेकरू
रक्ताचा वाळलेला थेंब करणार गुह्याची उकल, आयआयटी मुंबईत झाले संशोधन