आदित्य ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत, शुभेच्छा देण्यासाठी कुणीही ‘मातोश्री’वर येऊ नये

आदित्य ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत, शुभेच्छा देण्यासाठी कुणीही ‘मातोश्री’वर येऊ नये

गुजरातमधील भीषण विमान दुर्घटनेने अवघा देश सुन्न झाला असून या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांनी शिवसैनिक व युवासैनिकांना विनम्र आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांचा उद्या शुक्रवारी वाढदिवस असून ते ‘मातोश्री’ निवासस्थानी तमाम शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार होते. तसे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे आदित्य ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत. ‘‘वाढदिवसानिमित्त मला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची आपली इच्छा आहे. मात्र विमान दुर्घटना पाहता कुणीही माझी भेट घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे,’’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केले. विमान दुर्घटनेतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;