मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही

मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही

निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी नियम, 1960 नुसार, मतदारयादी मतदान केंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील 288 मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी, सतत माहितीची देवाणघेवाण केली जाते. आक्षेप घेण्यासाठी आणि अपील करण्यासाठी भरपूर संधीही दिली जाते, अशी सारवासारव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदान घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज सविस्तर स्पष्टीकरण दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;