Ahmedabad Plane Crash – भीषण…! अहमदाबादमधील दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू!

Ahmedabad Plane Crash – भीषण…! अहमदाबादमधील दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू!

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादमधील या दुर्घटनेत विमानतील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप केंद्र किंवा गुजरात सरकारकडून मृतांची कुठलीही अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

Air India Plane Crash – मोठा स्फोट झाला अन् परिसरात धुराचे लोट पसरले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली भीषण अपघाताची कहाणी

अहमदाबादमध्ये आज दुपारी विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत विमानातील 242 जणांपैकी एकहीजण वाचला नाही. अहमदाबादच्या पोलीस प्रमुखांनी म्हणजेच पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिल्याचे वृत्त AP या वृत्त संस्थेने दिले आहे. तर काही जखमी प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पण त्यांचं वाचणं कठीण दिसतंय, असे अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक म्हणाले. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

 

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानात 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडाचा नागरीक होते. विमान अपघातापूर्वी पायलटने मदत हवी, असा मेसेज दिला होता, असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;