माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडी रविवारी निघणार

माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडी रविवारी निघणार

आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीतील भाविकांना वैद्यकीय सेवासुविधा देण्यासाठी माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी रविवारी मुंबईतून निघणार आहे. माऊली चॅरिटेबल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीमध्ये शेकडो तज्ञ डॉक्टर आणि अनुभवी मेडिकल स्टाफ आणि 6 रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. दरम्यान, श्री स्वामी समर्थ महाराज यांची एकमेव पादुका दिंडी रथ आणि वारकरी सांप्रदायाकरिता महाप्रसाद सेवा अर्पण केली जाणार आहे.

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीकरिता माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडीचा प्रस्थान सोहळा रविवार, 15 जूनला सकाळी होणार आहे. सकाळी 8.30 ते 9.30 श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पूजन व अभिषेक होणार आहे. सकाळी 9.30 ते 10.30 श्री स्वामी समर्थ महाराज मठ, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याजवळून काही अंतरावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हेमाडपंथी कीर्तन संस्थेपर्यंत पायी दिंडी प्रवास करणार आहे. सकाळी 10.30 ते 11.30 हरी माधव वैद्य हॉल, कासारवाडी शेजारी, शिवसेना भवन समोरील कोहिनूर स्क्वेअर मॉलच्या मागील बाजूस या ठिकाणी महाप्रसाद वितरण होणार आहे. त्यानंतर दिंडी श्रीक्षेत्र आळंदीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे, अशी माहिती माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त अरविंद भोसले यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;