Israel attack Iran – इस्रायलचा इराणवर ‘एअरस्ट्राईक’, राजधानी तेहरानवर शेकडो मिसाईल्स, ड्रोनने हल्ला, प्रचंड तणाव

Israel attack Iran – इस्रायलचा इराणवर ‘एअरस्ट्राईक’, राजधानी तेहरानवर शेकडो मिसाईल्स, ड्रोनने हल्ला, प्रचंड तणाव

जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. एकीकडे रशिया-युक्रेनचे युद्ध गेल्या तीन वर्षापासून सुरू असताना आता इस्रायल आणि इराणमध्येही युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने इराणवर एअरस्ट्राईक केला आहे. इस्रायलच्या सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ले केले आहेत. शेकडो मिसाईल्स, ड्रोनच्या सहाय्याने इस्रायलने इराणच्या सैन्य ठिकाणांवर आणि अणुप्रकल्पांवर हल्ला केला.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ला केला. इराणच्या अनेक अणुप्रकल्प आणि सैन्य ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. नातांज आणि फोर्दो अणुकेंद्रामध्ये स्फोट झाल्याचे वृत्त असून तेहरानमधील इमाम खुमैनी विमानतळही हवाई हल्ल्याच्या कचाट्यात सापडल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देश साखरझोपेत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे इराणचे नागरीक हादरून गेले आहेत. या हल्ल्यात इराणच्या चिफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र वाहतुकीसाठी बंद केले असून आणीबाणी लागू केली आहे. दुसरीकडे इराणकडून जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असल्याने इस्रायलनेही खबरदारीचा उपाय म्हणून आणीबाणीची घोषणा केली आहे. इराण कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी शक्यता इस्रायलच्या संरक्षण मंत्री इस्राइल काट्स यांनी व्यक्त केली आहे.

…तर पुढची पिढी जग पाहू शकणार नाही

इराणांच्या नातांज येथील मुख्य अणुउर्जा प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंझामीन नेतन्याही यांनी दिली. इराण 10 हजारांहून अधिक मिसाईल्स तयार करत आहे. हे मिसाईल्स आणि बॉम्ब बनवणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. तसेच बॉम्ब बनवण्याचे काम करणाऱ्या इराणी अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करत बॅलेस्टिक मिसाईल तयार करणाऱ्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. गरज असेपर्यंत ही कारवाई सुरू राहील. आताच कारवाई केली नाही तर पुढची पिढी जग पाहू शकणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तास आधीच इस्रायल इराणवर हल्ला करू शकतो अशी शक्यता वर्तवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमदार, खासदारांच्या विरोधातील प्रलंबित खटल्यांची माहिती न्यायालयाला सादर, कोर्टात सोमवारी निकाल आमदार, खासदारांच्या विरोधातील प्रलंबित खटल्यांची माहिती न्यायालयाला सादर, कोर्टात सोमवारी निकाल
राजकीय आंदोलने करणाऱया राज्यातील आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात कनिष्ठ न्यायालयात फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची माहिती बंद लिफाफ्यात हायकोर्ट रजिस्ट्रीने...
बँक ऑफ महाराष्ट्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर
बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’
तोंडात मधमाशी गेली अन्…; करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीसाठी कंगना रनौतची पोस्ट
चम्पूहरणम्, मृगयाकलह:.. नाशिककरांसाठी संस्कृत नाट्यसप्तकाची पर्वणी, 22 जून रोजी रंगणार महोत्सव
बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन
गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करू द्यावे, सार्वजनिक समन्वय समिती करणार मागणी