Air India Plane Crash – टेकऑफ करताना 30 सेकंदात मोठा आवाज झाला अन्…; बचावलेल्या प्रवाशानं सांगितला अपघाताचा थरार

Air India Plane Crash – टेकऑफ करताना 30 सेकंदात मोठा आवाज झाला अन्…; बचावलेल्या प्रवाशानं सांगितला अपघाताचा थरार

अहमदाबादहून लंडन जाणारे एअर इडियाचे ड्रिमलाईनर विमान गुरुवारी दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात 204 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले. या अपघातात चमत्कारीकरित्या एक प्रवासी बचावला आहे. रमेश विश्वकुमार(40) असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. रमेशच्या छाती, डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे. रमेश विश्वकुमार यांनी या अपघाताचा थरारक अनुभव सांगितला.

रमेश विश्वकुमार हे अपघातग्रस्त विमानात 11अ या सीटवर बसले होते. रमेश विश्वकुमार यांनी सांगितले की, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच अवघ्या 30 सेकंदात मोठा आवाज सुरू झाला आणि विमान कोसळले. विमान क्रॅश होताच रमेश यांनी विमानातून उडी घेतली. हे सर्व खूप वेगात झालं, असं रमेश विश्वकुमार यांनी सांगितले.

एअर इंडियाचे विमान AI-171 ने गुरुवारी दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले. त्यानंतर अवघ्या 30 सेकंदात विमानतळापासून काही अंतरावर मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;