Ahmedabad Plane Crash – विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन

Ahmedabad Plane Crash – विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन

अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी रुपाणी यांच्या निधनाबाबत माहिती दिली. विजय रूपाणी हे लंडनला आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते.

आमचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे याच विमानाने आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अमित शहा हे अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत, अशी माहिती देत सी. आर. पाटील यांनी भाजप परिवाराकडून विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

विजय रूपाणी हे दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. 2016 आणि 2021 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;