निवृत्तीच्या रांगेत अजूनही बरेच, डॅरेन सॅमीने दिली धक्कादायक माहिती

निवृत्तीच्या रांगेत अजूनही बरेच, डॅरेन सॅमीने दिली धक्कादायक माहिती

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने टी-20 लीग क्रिकेटला प्राधान्य देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 लीग क्रिकेटच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक खेळाडू हे देशासाठी खेळण्यापेक्षा या लीग क्रिकेटला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक खेळाडू निवृत्तीच्या रांगेत असल्याची धक्कादायक माहिती वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने व्यक्त केली आहे. वेस्ट इंडीजच्या संघासाठी खेळाडूंना देशासाठी खेळण्यास प्रेरित करणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचेही तो म्हणाला. दक्षिण आफ्रिकेचा हेनरीक क्लासननेही गेल्याच आठवडय़ात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला होता. त्याचप्रमाणे टी-20 क्रिकेटसाठी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलननेही आपली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.या धक्क्यातून सावरतो तोच निकोलस पूरनच्या निवृत्तीने देशापेक्षा टी-20 लीग महत्त्वाची, हे वास्तव समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’ बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे रोजी धाराशिव आणि तुळजापूर बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केले आणि आता याच बसस्थानकांच्या...
तोंडात मधमाशी गेली अन्…; करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीसाठी कंगना रनौतची पोस्ट
चम्पूहरणम्, मृगयाकलह:.. नाशिककरांसाठी संस्कृत नाट्यसप्तकाची पर्वणी, 22 जून रोजी रंगणार महोत्सव
बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन
गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करू द्यावे, सार्वजनिक समन्वय समिती करणार मागणी
शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले, हिंदू संघटनांनी इशारा देताच कारवाई
लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका बाधीत घोड्याला दयामरण दिले; जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक