अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 

अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 

दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचा रखडलेला पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी गुरुवारी निविदा जाहीर करण्यात आली. पुनर्विकासातून 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे.

दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीनमालक आहेत. या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ सुमारे 73,144.84 चौरस मीटर आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोटय़ा आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास केला जाणार आहे.

कामाठीपुरातील जमीनमालकांना मोबदला देण्यात येणार आहे. 50 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुटांचे 1 घर, 51 ते 100 चौ.मी. क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 2 घरे, 101 ते 150 चौ. मी. क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 3 घरे, 151 ते 200 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुटांची 4 घरे, 200 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक 50 चौ.मी. भूखंड क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 1 अतिरिक्त सदनिका मिळेल.

मोठ्या घरासोबत आलिशान सुविधा 

कामाठीपुराचा समूह पुनर्विकास म्हाडातर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034,  विनियम 33 (9) अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून मेसर्स माहीमतुरा कन्स्लटन्ट यांची नियुक्ती करण्यात आली. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या घरांसोबत वाणिज्यिक इमारत, मनोरंजनाचे मैदान यासारख्या सुविधादेखील मिळणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;