Ratnagiri News – लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून बालकाचा मृत्यू, दापोलीतील हृदयद्रावक घटना

Ratnagiri News – लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून बालकाचा मृत्यू, दापोलीतील हृदयद्रावक घटना

लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दापोलीत घडली. समीर श्रीकांत चव्हण असे मयत बालकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस आणि तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत चव्हाण हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त दापोली येथे राहत होता. श्रीकांत हा जेसीबी चालक तसेच मजुरीचे काम करतो. दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोफत जेवणाची सोय असल्याने श्रीकांत आपल्या दोन्ही मुलांसोबत तेथे जेवणासाठी आला होता.

श्रीकांत जेवण घेण्यासाठी गेला आणि त्याची दोन्ही मुलं तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होती. यादरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आला होता. पावसामुळे खड्ड्यात पाणी साठले होते. समीर खेळता खेळता खड्ड्याजवळ गेला आणि तोल जाऊन पाण्यात पडला. पाण्यात बुडून समीरचा मृत्यू झाला.

दरम्यान बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा एक कामगार खड्ड्यातून पाणी काढण्यासाठी तेथे आला. या कामगाराला पाण्यात लहान मुलाच्या चपला दिसल्या. श्रीकांत चव्हाण आपल्या मुलाला शोधत असल्याचे समजले. या कामगाराने पाण्यात उडी घेत मुलाचा शोध घेतला असता समीरचा मृतदेह त्याला आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार बोंबे (घोलप), दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, शहर प्रमुख संदीप चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता केवारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित
तुमच्यापैकी अनेकांनी मशरूमची भाजी आवडत असेल. शास्त्रज्ञांच्या मते यात अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डेथ...
काजळाप्रमाणे डोळ्यांत लावा साजूक तूप, आयुर्वेदात सांगितले आहेत हे आश्चर्यकारक फायदे
टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना पत्र
India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका
Air India Plane Crash – कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; बोइंग ड्रीमलायनर्सच्या ताफ्याची तपासणी होणार, DGCA चा मोठा निर्णय
Air India Plane Crash – दोन मुलांना घेऊन नवीन घरात प्रवेश करण्याचं स्वप्न अपघाताने हिरावलं, केरळच्या रंजीताचा दुर्दैवी मृत्यू
आयुर्वेदानुसार चुकूनही या पदार्थांचे सेवन एकत्र करु नये