Air India Plane Crash – न्हावा येथील एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा मृत्यू

Air India Plane Crash – न्हावा येथील एअर होस्टेस मैथिली पाटील हिचा मृत्यू

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले. या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करीत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील (२३) हिचा मृत्यू झाला आहे. अपघाताची खबर मिळताच तिचे कुंटुबीय गुरुवारी दुपारी अहमदाबादकडे रवाना झाले.

मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत होती. गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात मैथिलीची ड्युटी होती. त्यामुळे विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी मैथिलीने आपल्या आई वडिल व कुटुंबीयांसोबत होती. गुरुवारी सकाळीच मैथिली मुंबई मार्गे अहमदाबाद येथील एअरपोर्टला रवाना झाली होती. त्यानंतर एअर इंडियाचे हे विमान 12 क्रू सदस्यांसह 242 प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात असतानाच रहिवासी भागात दुर्घटनाग्रस्त झाले. विमान दुर्घटनेची खबर मिळताच मैथिलीचे वडील, आई, मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले असल्याची माहिती निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;