Air India Plane Crash – ‘टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 1 कोटीची मदत

Air India Plane Crash – ‘टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक 1 कोटीची मदत

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अद्याप याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना टाटा ग्रृपकडून प्रत्येकी एक कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. टाटा ग्रृपकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. तसेच जखमींचा खर्च देखील टाटा ग्रुपकडून करण्यात येणार आहे.

एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान अहमदाबादमध्ये कोसळले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळवरून उड्डान घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही क्षणातच मेघानीनगर भागातील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर होते. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सह 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणार होते. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान कोसळले. या विमानामध्ये क्रू मेंबरसर 242 प्रवासी होते. यापैकी 169 जण हिंदुस्थानी होते, तर 53 जण ब्रिटिश नागरीक होते. 7 जण पोर्तुगालचे आणि 1 जण कॅनडाचा नागरीक होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;