कोकणात वीजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी; रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट

कोकणात वीजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी; रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील चार दिवस या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंप ते गणेश नगर परिसरात गुडघ्याहून अधिक पाणी रस्त्यावर साचले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

वाहनचालकांमधून तसेच आजूबाजूच्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का? मुसळधार पावसात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडवणार का? असे सवाल नागरिक करत आहेत. याकडे आता प्रशासन किती गांभीर्याने पाहते हे पहावे लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;