पंजाब नॅशनल बँकेला मराठीचं वावडं, कोपरखैरणेमधील शाखेत RBI च्या नियमांचं उल्लंघन

पंजाब नॅशनल बँकेला मराठीचं वावडं, कोपरखैरणेमधील शाखेत RBI च्या नियमांचं उल्लंघन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्देशानुसार, हिंदुस्थानातील सर्व बँकांमध्ये त्रिभाषा सूत्र अवलंबिले जाते. म्हणजेच इंग्रजी, हिंदी आणि तिसरी त्या राज्याची राज्य भाषा. म्हणजेच महाराष्ट्रात मराठी भाषा. त्यामुळे बँकेतील सर्व फलक तीन भाषांमध्ये असणं बंधनकारक आहे. असे असताना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये मराठी भाषेला डावलून हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या कोपरखैरणे शाखेला RBI च्या नियमांचा विसर पडलाय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

माथाडी कामगारांसह सर्व सामान्य नागरिक कोपरखैरणेमध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे सर्वांनाच हिंदी किंवा इंग्रजी वाचता येत नाही. मराठीमध्ये व्यवहार करण्याला प्राधान्य दिलं जातं. असे असताना नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-20 येथील पंजाब नॅशनल बँकेतील फलक हिंदी आणि इंग्रजीमध्ये असल्यामुळे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा मराठी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॅश काउंटरवरील फलकासह काही फलक हे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये लावण्यात आले आहेत. जसे की, “क्या मैं आपकी सहायता कर सकता हूँ, “वरिष्ठ नागरिक काउन्टर, “कटे-फटे नोट एवं सिक्के यहां स्वीकार किये जाते हैं.” अशा पद्धतीने हे सर्व फलक फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये लावण्यात आले आहेत. बँकेच्या ग्राहकांसाठी व्यवहाराच्या दृष्टीने हे तिन्ही काउंटर महत्त्वाचे आहेत. असे असताना या तिन्ही काउंटरवर मराठी भाषेचा समावेश नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या कोपरखैरणे शाखेला RBI च्या नियमांचा विसर पडलाय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;