मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट

मुंबईगोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत. भोस्ते घाटातील अवघड वळण हे वाहनचालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. सद्यस्थितीत परशुराम घाटातील काम अर्धवटस्थितीत आहे. कशेडी घाटाला पर्यायी बोगदा काढण्यात आलेला आहे. हे सारेच सुरळीत दिसत असले तरीदेखील या घाटातील अवघड वळणे जीवघेणी ठरत असून पावसाळ्यात या वळणाचा अधिक धोका संभवतो. त्याचबरोबर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचादेखील धोका आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात घाटातून प्रवास बिकटच म्हणावा लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;