प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार

प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार

मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी पालिका मुलुंडमध्ये 6731 घरे बांधत आहे. या घरांच्या योजनेमुळे रहिवाशांच्या विरोधामुळे रखडलेले पालिकेचे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यास मोठी मदत होणार आहे. घरांची ही कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना आज घर बांधणी प्रकल्प पाहणीनंतर दिले.

पालिकेच्या माध्यमातून विकास आराखडा, सर्वसमावेशक वाहतूक योजना-रस्ते, पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांसाठी अनेक वेळा सदर जमीन भारमुक्त करताना प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे द्यावी लागतात. यामध्ये निवासी जागेसाठी मालमत्ता खात्याकडून तर अनिवासी बांधकामांना बाजार खात्याकडून पर्यायी जागा देण्यात येतात. सद्यस्थितीत पालिकेने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पात सुमारे 36 हजारांवर घरांची गरज आहे. प्रकल्पबाधितांना पुनर्वसनात ते राहत असलेल्या ठिकाणीच घर मिळावे, अशी मागणी असते. त्यामुळे या उपक्रमात पालिकेच्या सातही झोनमध्ये पाच हजारांवर घरे उपलब्ध होणार असल्यामुळे प्रकल्पबाधितांना ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच घरे उपलब्ध होणार आहेत. शिवाय प्रदूषणाचे कारण देत माहुलमध्ये जाण्यास होणारा विरोधही टळणार असल्याने पालिकेचे विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीस जोर मिळणार आहे.

300 चौरस फुटांचे घर मिळणार

प्रकल्पबाधितांसाठी पालिकेकडून मुलुंड पूर्व येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे 30,954 चौरस मीटर क्षेत्रफळावर 5 इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये तळमजला प्लस 22 मजल्यांच्या 4 इमारती तर तळमजला प्लस 25 मजल्याच्या एका इमारतीचा समावेश आहे. प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ 300 चौरस फूट असून त्यामध्ये बैठक, शयनकक्ष (संलग्नित पाश्चिमात्य शैलीचे स्वच्छतागृह), स्वयंपाकघर, सामाईक स्वच्छतागृह (कॉमन बाथरूम) यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;