Air India Plane Crash – मी वाढदिवस साजरा करणार नाही… आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

Air India Plane Crash – मी वाढदिवस साजरा करणार नाही… आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना भेटणार होते. मात्र अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

”मला भेटायला येणाऱ्या व्यक्तींसोबत उद्या मी माझा वाढदिवस साजरा करणार होतो. पण आज अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संवेदना या दुर्घटनेतील पीडितांसोबत व त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की जे कुणी उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा द्यायला येणार होते त्यांनी येऊ नये. माझ्या विनंतीला मान द्यावा”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नखांवर हलक्या रेषा येणे कोणत्या आजाराचे संकेत? आताच व्हा सावधान नखांवर हलक्या रेषा येणे कोणत्या आजाराचे संकेत? आताच व्हा सावधान
स्वच्छ आणि सुंदर नखे हातांचे सौंदर्य वाढवतात. पण जर नखे खराब होऊ लागली, तुटू लागली, काळी पडू लागली, पिवळी पडू...
थायरॉइडसाठी रामबाण आहे पतंजलीचं हे औषध; असा होतो परिणाम
वजन कमी करण्यासाठी हजार उपाय करुन थकलात, मग हे फळ खाऊन बघा!
Air India Plane Crash – धुरचं धूर, काहीच दिसेना… ब्लँकेट गुंडाळत अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला स्वतःचा जीव
Air India Plane Crash – विमान अपघातातील जीवितहानीने अत्यंत दु:खी; रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडून शोक व्यक्त
Air India Plane Crash – “अत्यंत असंवेदनशील…”; दुर्घटना कोणी रोखू शकत नाही असे म्हणणाऱ्या अमित शहांवर काँग्रेसची सडकून टीका
Air India Plane Crash – पायलट लेक गेला, 90 वर्षांच्या वडिलांची काठी हरपली!