जांभूळ खाण्यामुळे आपल्या शरीराला मिळतील हे महत्त्वाचे फायदे

जांभूळ खाण्यामुळे आपल्या शरीराला मिळतील हे महत्त्वाचे फायदे

जांभूळ खाणे अनेकांना आवडते. त्यात असलेले पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.  जांभूळ रोज खाल्ले तर शरीराला त्याचे कोणते फायदे होतात. नेहमी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि थंडावा देण्यास मदत करतात. त्यामध्ये फळांपैकी जांभळाचाही समावेश आहे. दररोज जांभूळ खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

जांभूळात व्हिटॅमिन सी, बी 12 , लोह आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. ते खनिजे आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. म्हणून, आहारात नियमितपणे त्याचा समावेश करणे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जांभळाचा थंड प्रभाव असतो. त्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

जांभूळ खाल्ल्याने पचन सुधारण्यासही मदत होते. जांभूळात अँथोसायनिन हा घटक असतो, जो आपल्या पेशींसाठी खूप चांगला असतो. यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. कारण ते लोहाचा एक चांगला स्रोत देखील आहे. त्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे होणारी रक्ताची कमतरता याद्वारे भरून काढता येते.

 

Jackfruit Recipe – फणसाचे रसाळ गरे खाऊन बिया फेकू नका, करा मस्त चमचमीत आरोग्यवर्धक आठळ्यांची भाजी

जांभूळात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे ते वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट भरलेले वाटते आणि जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवता येते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

जांभूळात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. दिवसातून 200 ग्रॅम जांभूळ खाऊ शकतो. परंतु ते तुमच्या शरीराच्या गरजेनुसार मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;