क्रेडिट कार्ड फ्रॉड करणाऱ्याला शीव पोलिसांकडून दिल्लीत अटक

क्रेडिट कार्ड फ्रॉड करणाऱ्याला शीव पोलिसांकडून दिल्लीत अटक

बँकेतून बोलतोय, तुमच्या व्रेडिट कार्डचे लिमिट वाढवायचे आहे का, अशी विचारणा करत संबंधितांचा विश्वास संपादन करायचा. मग लिंक पाठवून त्यात व्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱया भामटय़ाला शीव पोलिसांनी दिल्लीत जाऊन अटक केली.

कमल (नाव बदललेले) हे घरी असताना त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉलरने तो ऑक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या व्रेडिटचे लिमिट वाढवायचे आहे का, असे विचारत तसेच विविध भूलथापा मारून कमल यांचा विश्वास संपादन केला. मग एक लिंक पाठवून त्यात व्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. कमल यांनी त्याप्रमाणे माहिती भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील चार लाख 54 हजार दुसऱया खात्यावर वळते झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शीव पोलिसांत तक्रार दिली.

याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर उपायुक्त रागसुधा, वरिष्ठ निरीक्षक मनीषा शिर्पे, सपोनि दत्तात्रय खाडे, उपनिरीक्षक मंगेश खामकर व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचे विश्लेषण केल्यावर आरोपी दिल्लीत असल्याचे समोर आले. पथकाने तत्काळ दिल्ली गाठून 11 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी इंटरनेटी इंटलेक्शन कॉल सेंटरमधील एका रूममध्ये बोगस कॉल सेंटर आढळून आले. हे कॉल सेंटर चालविणाऱया मनजितकुमार सिंग याला पोलिसांनी पकडले. तोच या बोगस कॉल सेंटरमधून तरुणांना कॉल करायला भाग पाडून व्रेडिट कार्ड फ्रॉड करत असल्याचे समोर आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;